Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : धुळे जिल्ह्यात आज यलो अलर्ट; या भागात राहणार अधिक जोर

Dhule News : खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप काही भाग कोरडा आहे.

भूषण अहिरे

धुळे : राज्यात सर्वत्र मॉन्सून सक्रिय झाला आहे. तर काही भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यात धुळे जिल्ह्यात देखील अद्याप चांगला पाऊस झालेला नसून पेरण्या रखडलेल्या आहेत. मात्र हवामान विभागाकडून आज जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस पडण्याची शक्यता असून सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहण्यास मिळत आहे. 

मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक भागामध्ये दमदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक जिल्ह्याच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप काही भाग कोरडा आहे. हीच परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात आहे. 

धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता 

हवामान विभागातर्फे धुळे शहरासह जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. त्यातच आज धुळे जिल्ह्याला हवामान विभागातर्फे यलो अलर्ट देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सकाळपासून ढगाळ वातावरण असून दमदार पावसाची शक्यता आहे. 

जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता 
धुळे जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून जळगाव जिल्ह्यात देखील दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळपासूनच जळगाव शहर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच शेतीची मशागतीची सर्व कामे आटोपून पेरण्या देखील केल्या, परंतु त्यानंतर मात्र पावसाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

Study Tips: झोपण्यापूर्वी की सकाळी उठल्यानंतर? कोणत्या वेळेत अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते?

Manoj jarange patil protest live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन-जपान दौऱ्यानंतर भारतात पोहोचले

Maratha Reservation: संघर्ष पेटणार! ओबीसीही मुंबईत धडकणार? मनोज जरांगेंच्या उपोषणाला उपोषणाने उत्तर देणार

SCROLL FOR NEXT