Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : दुचाकी चोरटे मालेगावमधून ताब्यात; सात दुचाकी केल्या हस्तगत

dhule News : धुळे शहरातील विविध कारवाईन संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या कारवायांची माहिती दिली.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातून मागील काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत तपस करत पोलिसांनी दुचाकी चोरट्याना नाशिक जिल्ह्यातील (Malegaon) मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून (Dhule) चोरलेल्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. याशिवाय शहर व जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यातील २३ आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

धुळे शहरातील विविध कारवाईन संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या कारवायांची माहिती दिली. प्रामुख्याने विभागीय (Police) पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी चोरणाऱ्या टोळीबाबत तपास सुरू केला असता, मालेगाव येथील तिघा सराईत चोरट्यांना पथकाने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून (dhule Police) जवळपास सात चोरीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेगवेगळ्या गुन्ह्यातील २३ आरोपी ताब्यात 
त्याचबरोबर त्यांच्या टीमने देवपूर येथील चैन स्नॅचिंगचा देखील गुन्हा उघडकीस अणला असून, अहमदनगर येथील चोरट्यानी चोरी केलेल्या मुद्देमालासकट मुस्क्या आवळल्या. बहुतांश गुन्ह्यामध्ये फरार असलेले जवळपास २३ आरोपी देखील रेड्डी यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे पोलीस अधीक्षकांतर्फे सांगण्यात आले. त्याचबरोबर हातभट्टी, जुगार अड्डे यासारखे गुन्हे देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे उघडकीस आणण्यात आले असून, त्यात देखील पाच आरोपींच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : माजी आयुक्ताला ईडीचा दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनात ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते?

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

SCROLL FOR NEXT