Temperature of Maharashtra's Dhule District Saam TV
महाराष्ट्र

Dhule Weather: धुळ्यात उन्हाचा चटका वाढला; तापमान पोहचले ४३ अंशाच्यावर

Dhule Temprature News: यंदा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार आता तापमान आता वाढत असून सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे.

भूषण अहिरे

धुळे : राज्यात मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरलेली आहे. यात खानदेशात तापमानाने उच्चांक गाठला आहे. धुळे शहरात देखील तापमान वाढण्यास सुरवात झाली असून धुळ्यात आज उच्चांकी ४३. अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

यंदा अधिक तापमान (Temperature) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार आता तापमान आता वाढत असून सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. दरम्यान धुळे (Dhule) शहरासह जिल्हाभरामध्ये उष्णतेची लाट अद्याप कायमच आहे. आज देखील धुळ्यामध्ये ४३. अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, जवळपास महिनाभरापासून धुळ्यामध्ये तापमानाचा पारा हा ४० अंशाच्या पार असून गेल्या काही दिवसांपासून हा तापमानाचा पारा आणखीनच वाढल्याचे बघायला मिळाले आहे. 

तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता 
पुढील काही दिवस अशाच प्रकारे उष्णतेची लाट (Heat Wave) धुळ्यात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याने कामाशिवाय बाहेर निघण्याचे टाळावे. तसेच उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganewadi Jatra: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी गाव आहे तरी कुठे? यात्रेची खास परंपरा

BMC Election: दुबार-तिबार नाही, तर ४ मतदारांची १०३ वेळा नावं, मतदारयादीतला सर्वात मोठा घोळ उघड

Methi Pulao Recipe: टिफिनसाठी पालेभाज्या-चपातीचा कंटाळा आला? ट्राय करा मेथीचा झणझणीत पुलाव, एकदा रेसिपी वाचाच

टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; धाकड ऑलराउंडरचं कमबॅक, शुभमन गिलबाबत घेतला मोठा निर्णय

५६ वर्षांच्या नराधमाकडून ६ वर्षीय मुलीवर शाळेच्या आवारात अत्याचार; अमरावतीमधील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT