viral video 
महाराष्ट्र

तहसील अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

तहसील अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

भूषण अहिरे

धुळे : तहसील अधिकाऱ्यांना अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अवैधपणे गौण खनिजांचे उत्खनन करून घेऊन जाणाऱ्यांची अडवणूक तहसील अधिकारी सुदाम महाजन यांच्याकडून झाल्यानंतर संबंधितांकडून तहसील अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. (dhule-news-Tehsil-officers-threatened-with-death-Video-goes-viral-social-media)

अवैधपणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी कशा पद्धतीने वाढली आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत असून कुठल्याही प्रकारच्या कारवाईची भीती न बाळगता राजरोसपणे गौण खनिजाचे उत्खनन केले जात असल्याचेच या दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे.

धमकीनंतरही त्‍यांनी केली कारवाई

अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांकडून तहसील अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर कारवाई करण्यासाठी पोहोचलेल्या तहसील अधिकाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून देखील कारवाई न करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. अशा परिस्थितीत देखील तहसील अधिकारी सुदाम महाजन यांनी कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता कारवाई करण्याचा निर्धार करीत संबंधितांवर कारवाई केली आहे. यासंदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात संबंधित तहसील अधिकारी सुदाम महाजन यांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Skin Tips: मऊ- मुलायम त्वचेसाठी घरगुती 5 सोपे उपाय

Soft Chapati Tips: चपाती बनवताना खूप अडचणी येतात? गोल आणि मऊ चपात्यांसाठी 'ही' पद्धत लगेचच वापरा

Maharashtra Live News Update : घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार, पुणे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा मध्यरात्री एअरस्ट्राइक, काबूलमध्ये ४०० जणांचा मृत्यू, २५० गंभीर जखमी

Success Story: १० वर्ष ९ ते ५ नोकरी; सकाळी ४ वाजता उठून अभ्यास; पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS नविता कुमारी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT