चक्‍क बैलाचा वाढदिवस..केकही कापला अन्‌ डिजे, आतषबाजी करत दहावा वाढदिवस साजरा

चक्‍क बैलाचा वाढदिवस..केकही कापला अन्‌ डिजे, आतषबाजी करत दहावा वाढदिवस साजरा
bulls birthday
bulls birthday
Published On

जळगाव : मित्राचा वाढदिवस असला म्‍हणजे सेलिब्रेशन आलेच. सर्व मित्रांना जमवून केक कापायचा व त्‍याच्‍याकडून पार्टी देखील घ्यायची. हे आजकाल सगळीकडेच पाहायला मिळते. परंतु, शेतात राबणारा बळीराजाच्‍या मित्र बैलाचा वाढदिवस कधी पाहिला किंवा ऐकलाही नसेल. मात्र हे झालेय चक्‍क बैलाचा दहावा वाढदिवस म्‍हणून फुग्‍यांची सजावट, फटाक्‍यांची आतषबाजी, डिजे लावून नाचगाण्यांचा कार्यक्रम अन्‌ केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. (jalgaon-news-farmer-Bull's-tenth-birthday-Celebration-Cut-the-cake-and-DJ)

bulls birthday
मध्‍यरात्रीनंतर कामावरून घरी आला..त्याने बाहेरून कडी लावली अन्‌ संपविली जीवनयात्रा

बर्थ डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. एरव्ही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियावर तरुणाईचा जल्लोष अशा गाण्यातून ओसंडुन वाहत असतो. पण शेतात राबणाऱ्या व पाचशेवर शामीगोंडा शर्यतीत विजयी पताका फडकवीत मानाचा शामीगोंडा पटकावीत अंजिक्य ठरलेल्या जिवाभावाच्या मैतर असलेल्या शिवा बैलाचा दहावा वाढदिवस मालक गोपाल सुरतसिंग परदेशी (रा. वाडे. ता. भडगाव) यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मुक्या जिवाप्रती असलेला आदरभाव, प्रेम व्यक्त करणारा हा वाढदिवस सोहळा परिसरात आगळावेगळा ठरला आहे.

शेती कामात शेतकऱ्याला मदत करणारा शेतात राब राबणारा. शेतकऱ्याचा जिवाभावाचा अन मैत्र म्हणजे बैल. बैलपोळ्याला बैलांना सजवून पुरणपोळीचा गोड घास बैल मैतराला घातला जातो. घरोघरी औक्षणही केले जाते. कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र आदर्श शेतकरी गोपाल परदेशी यांनी आपल्या जिवाभावाचा सोबती शिवा बैल मैतराचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात वाजत गाजत साजरा केला. शामीगोंडा बिनजोड शर्यतीत नावाजलेला हिंदकेसरी शिवा हा महाराष्‍ट्रात प्रख्यात झाला आहे.

bulls birthday
मोटारसायकलवरून येत बसवर केली दगडफेक; चालक किरकोळ जखमी

मंडपात कापला केक अन्‌ घातला खाऊ

वाडे शिवारातील गोंडगाव रस्त्यालगत शेतात विविधरंगी फुगे, डिजीटल बँनर आदींनी सजविलेल्या मंडपात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डिजेच्या तालावर तेरे मनमे शिवा मेरे मनमे शिवा, ढवळा बैल मन्हा नंदीना राजा यासह विविध गाण्यांवर डिजेच्या संगीताच्या तालावर तरुणांनी नाचत वाजत आनंद साजरा केला. यावेळी शेतकरी कुटुंबामार्फत या शिवाचे औक्षण करुन केक कापण्याचा कार्यक्रम केला. तसेच शिवा बैल मैत्रालाही केक खाऊ घालीत हॅपी बर्थ डे शिवा अशा वाढदिवसानिमित्त उपस्थित शेतकऱ्यांसह तरुणांनी शिवा मैत्रराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फटाक्‍यांची आतषबाजी व फोटोसेशन

वाढदिवसानंतर शिवासोबत तरुणांनी फोटोशेषनही केले. फटाक्यांच्या आतषबाजीने वाढदिवस साजरा झाला. तसेच यावेळी वाढदिवसानिमित्त खमंग जेवणाची मेजवानीही ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमास शेतकरी कुटुंबातील अनेक दिग्गजांनी शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. मंडपात शिवाचा वाढदिवसाच्या शुभेच्छाचा डिजीटल फलक शिवा गृप वाडे, जय शंभु महाकाल गृप कजगाव या नावाने झळकत होता. या वाढदिवसाचे आयोजन गोपाल परदेशी या शेतकरी कुटुंबाने प्रथमच केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com