महाराष्ट्र

शहीद जवानाचे पार्थिव धुळ्यात आणताच कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला

शहीद जवानाचा मृतदेह धुळ्यात आणताच कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला

भूषण अहिरे

धुळे : मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना गोळी लागून मृत्यूशी झुंज देणाऱ्या निलेश महाजन यांची उपचार सुरू असताना मृत्यूशी झुंज थांबली. शहीद झालेल्या निलेशचा मृतदेह धुळ्यातील सोनगीर येथे आणण्यात आला. (dhule-news-soon-as-the-body-of-the-martyred-soldier-was-brought-to-Dhule)

जवान निलेश महाजन यांचा तीन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शहीद जवानाचा मृतदेह धुळ्यात आणण्यास विलंब झाला. परंतु आज शहीद जवानाचा मृतदेह धुळ्यातील सोनगीर येथे आणण्यात आला. शहीद जवान निलेश महाजन यांचा मृतदेह सोनगीर येथे आणताच कुटुंबियांचा व प्रियजनांचा अश्रूंचा बांध फुटला.

नऊ महिन्‍यांची झुंज

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील मूळचे रहिवासी असणारे आणि सध्या सोनगीर येथे वास्तव्यास असलेले निलेश महाजन हे मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे ड्युटी बजावत असताना त्यांना गोळी लागली होती. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहटी येथे उपचार सुरू होते. मात्र अखेर गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची मृत्यूशी झुंज संपली असून ते शहीद झाले आहेत.

शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

शाहिद नीलेश महाजन यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र काही प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पार्थिव आज सोनगीर येथे आणण्यात आले. पुढील थोड्याच वेळात शहिद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Kanda Bhaji Recipe : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

मोठी बातमी! अजित पवारांच्या जयंतीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

SCROLL FOR NEXT