डेंग्यू
डेंग्यू 
महाराष्ट्र

प्रशासनाचे दुर्लक्ष; सामाजिक कार्यकर्ते आले पुढे..डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया त्याचबरोबर चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांनी डोक वर काढल आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार विविध संघटनांतर्फे तसेच नागरिकांतर्फे उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले जात असून नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकरीता आता सामाजिक कार्यकर्तेच सरसावले आहेत. (dhule-news-Social-workers-came-forward-dengue-malaria-increasing-incidence)

डेंगू, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावामध्ये औषध फवारणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत गावामध्ये औषध फवारणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते शाणाभाऊ कोळी यांनी अखेर डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ग्रामस्थांची मागणी बघता स्वतः स्वखर्चातून कुंभारे येथे युवकांनासोबत घेऊन संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी केली आहे.

कोरडा दिवस पाळा

डेंग्यूमुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक हे त्रस्त झाले असताना संबंधित प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. प्रशासकीय अधिकारी नागरिकांच्या मृत्यूची वाट बघत आहेत का? असा देखील प्रश्न या निमित्ताने शानाभाऊ कोळी यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे देखील आवाहन कोळी यांनी नागरिकांना केले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शानाभाऊ कोळी यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता गावामध्ये औषध फवारणी केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT