धुळ्यातील दिव्यांनी उजळणार इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया!

धुळ्यातील दिव्यांनी उजळणार इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया!
Diwali Festival
Diwali Festival

धुळे : धुळ्यातील केंद्रीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेल्या पणत्यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी परदेशात राहणाऱ्या परदेशी भारतीयांची दिवाळी उजळणार आहे. (dhule-news-England-USA-and-Australia-will-be-lit-by-white-lights-in-diwal-festival)

धुळे तालुक्यातील केंद्रीय आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कच्च्या मालापासून आकर्षक व सुबक अशा मनमोहक पणत्या बनवल्या आहेत. धुळ्यातील या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पणत्यांना विदेशातून म्हणजेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन येथे स्थायिक झालेल्या भारतीयांकडून ऑनलाइन पद्धतीने या दिव्यांची बुकिंग देखील करण्यात आली आहे. ऑर्डरप्रमाणे त्यांची पॅकिंग देखील करण्यात आली असून परदेशात राहणाऱ्या भारतीयांची दिवाळी धुळ्यातील या आश्रम शाळेतील मुलांनी बनविलेल्या दिव्यांनी उजळून निघणार आहे.

सर्व व्‍यवहार पाहतात विद्यार्थी

पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच व्यवहारिक ज्ञान देखील विद्यार्थ्यांना मिळावे; या संकल्पनेतून हे व्यवहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना केंद्रीय आश्रम शाळा प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. बाजारातून कच्चामाल आणण्यापासून तर पोस्टाने हा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व व्यवहार येथील विद्यार्थीच बघतात. शाळेबाहेर पडल्यानंतर व्यवहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत असावे हाच या मागचा हेतू असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

Diwali Festival
केळी पिक विमा नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता धूसर; लोकप्रतिनिधींचा नुकसाच दावा

कर्ज स्‍वरूपात पैसा

विद्यार्थ्याचे व्यवहारिक ज्ञान वाढावे; यासाठी शाळा प्रशासनातर्फे या विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध करून दिला जातो. त्याच पैशातून या विद्यार्थ्यांकडून कच्चा माल खरेदी करून त्याचे पक्‍क्‍या मालात रुपांतर करीत तो बाजारामध्ये विकण्यापासून ते विकलेल्या मालाचा संपूर्ण हिशोब ठेवण्यापर्यंत विद्यार्थ्यांवरच ही जबाबदारी शाळा प्रशासनातर्फे सोपविण्यात येते. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने बनवून विकलेल्या वस्तू पासून मिळालेला नफा देखील हा विद्यार्थ्यांनाच देण्यात येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com