Loan
Loan Saam tv
महाराष्ट्र

समाज कल्याणच्या शिपायाचा प्रताप; तब्बल ६० टक्के व्याजाने दिले कर्ज

साम टिव्ही ब्युरो

धुळे : एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्यानंतर आता इतर अवैध सावकारांचेही प्रताप समोर येत आहेत. समाज कल्याण विभागाचा शिपाई व्याजाने पैसे देत असून, त्याने महिलेच्या अडचणीचा गैरफायदा घेतला. दोन लाख रुपये देत एक लाख रुपये तब्बल ६० टक्के व्याजाने दिले. तसेच घराची सौदा पावतीही (Dhule News) करून घेतली. नंतर एक लाखाच्या बदल्यात दहा लाखांची मागणी करीत तोपर्यंत घर रिकामे करणार नाही, अशी धमकी देत त्रास दिला. या प्रकरणी शिपायावर शहर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (dhule news social welfare department employee Loans at 60 percentage interest)

शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत माधुरी प्रशांत मराठे (वय ४५) यांचे वास्तव्य आहे. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समाज कल्याण विभागाचा शिपाई रवींद्र अर्जुन शिरसाट (रा. भावसार कॉलनी) हा अवैध सावकारीचा व्यवसाय करतो. त्याने कॉलनीतील अनेकांना व्याजाने पैसे दिले आहेत. फिर्यादी महिलेला मालकीच्या प्लॉट नंबर ३३ मधील पूर्वीचे ताबेगहाण पद्धतीने राहणाऱ्या भाडेकरुंना तत्काळ दोन लाख रुपये परत करायचे होते. त्याचा फायदा घेत दोन लाख रुपये दिले.

ताबेगहाण करारनामा

तसेच एक लाख रुपये ६० टक्के व्याजाने देत ताबेगहाण करारनामा करुन घेतले. जास्त व्याजासाठी आणि त्यापोटी त्याने न घेतलेल्या चार लाख रुपयांची ताबे गहाण पावती करुन स्वत:जवळ ठेवली. नंतर फिर्यादीच्या सासू राधाबाई रघुनाथ भालशिंगे यांची फसवणूक करत घराची सौदा पावती करुन घेतली. घर विक्रीसाठी तगादा लावून वकिलामार्फत नोटीस पाठवत फिर्यादीला धमकी दिली. तसेच सध्या शिरसाट हा फिर्यादीच्या तळमजल्यावरील घरात राहत असून मोठ्या प्रमाणावर व्याजाने पैशांची मागणी करत आहे. हा प्रकार पाच जून २०१५ पासून ते आजपर्यंत सुरू होता. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तपास करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT