बंडखोर आमदारांवर दबाव वाढतोय, शिंदे गट बंड गुंडाळणार?

मतदार संघातील शिवसैनिकांचा वाढता असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : मागील ५ दिवसांपासून गुवाहाटीत ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. एकिकडे शिवसेनेने (Shivsena) आमदारांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरु केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न अनेक आनदारांच्या मनात उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अमावस्येच्या आत म्हणजे २८ जूनपर्यंत बंड यशस्वी करण्याचा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा इरादा होता. मात्र, या मुहूर्ताच्या आतच सुरु झालेल्या वेगवान राजकीय कुरघोडीमुळे वेळ लागल्याने आता बंडखोर आमदार माघारी फिरणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे बंड यशस्वी करणार की त्यांच्याकडून देखील आमदार फुटणार हे पाहणं महत्वाचं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना एका अध्यात्मिक गुरूने येत्या अमावास्येच्या आतच राजयोग येणार असल्याचे सांगितल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. मात्र, शिवसेनेकडून करण्यात येत असलेली कायदेशिर कोंडी आणि राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शिंदे यांचा सत्तापालटाच्या इच्छेला ग्रहन लागलं आणि दिवसेंदिवस नवीन अडचणी शिंदे गटासमोर उभ्या रहात आहेत.

त्यामुळेच आता गेले दोन दिवस एकनाथ शिंदे आमदारांना वारंवार संयमाचे आवाहन करीत आहेत. मात्र, मतदार संघातील शिवसैनिकांचा वाढता असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना देखील सुरक्षिततेची काळजी सतावत असल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झालं आहे. गरच्यांशी संपर्क करायचा म्हटलं तर आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कुणाशी संपर्क देखील नसल्यामुळे आमदार त्रस्त झाले असून ते बंड गुंडाळणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com