Dhule News Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Dhule: निष्ठापत्र पाठवणाऱ्या त्‍या शिवसैनिकाला थेट मातोश्रीवर बोलावले

निष्ठापत्र पाठवणाऱ्या त्‍या शिवसैनिकाला थेट मातोश्रीवर बोलावले

भूषण अहिरे

धुळे : शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागल्यानंतर शिंदे गटांने आपली वेगळी चूल मांडली. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून ठाकरे समर्थक शिवसैनिकांतर्फे निष्ठापत्र भरून घेण्यात आले. यावेळी धुळ्यातील (Dhule) एका शिवसेनेच्या निष्ठावाने थेट आपल्या रक्तानेच निष्ठापत्र लिहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मातोश्रीवर पाठविले. या शिवसैनिकाला ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून भेट घेतली. (Dhule Shiv Sena News)

रक्ताने लिहून पाठवलेल्या निष्ठापत्राची दखल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत या निष्ठावान शिवसैनिकाला (Shiv Sena) मातोश्रीवरून बोलवणं धाडण्यात आले. त्यानंतर मनोज गवळी या शिवसैनिकाच्या पाठीवर शाब्बासची थाप देत उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळेभेट घेतली. या भेटीनंतर मनोज गवळी हे पूर्णपणे भारावून गेले. मनोज गवळी हे धुळ्यातील (MSRTC) परिवहन विभागात वाहक म्हणून कार्यरत आहेत. तसेच एसटी महामंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ते पदाधिकारी देखील आहेत.

तासभर केली चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मनोज गवळी व त्यांच्यासोबत असलेल्या धुळ्यातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जवळपास एक ते दीड तास निवांत चर्चा करून त्यांची विचारपूस केली. शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या वळविला दूर करण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मनोज गवळी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT