Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule : कचरा घोटाळ्यासंदर्भात शरद पवार गट आक्रमक; आयुक्तांना दिले भ्रष्ट्राचार झाल्याचे पुरावे

Dhule News : शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ठेका दिलेला आहे. असे असताना देखील शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढल्याचे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. अनेक कॉलन्यांमध्ये १५ ते २५ दिवस घंटागाडी फिरकत नाही

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे कचरा संकलना संदर्भात सुरू असलेल्या अनागोंदी कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. या कारभाराविरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. या भ्रष्टाचारा संदर्भातील पुरावेच थेट धुळे महानगरपालिका आयुक्तांना देत या सर्व प्रकाराची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीच यावेळी करण्यात आली आहे,

धुळे शहर महापालिकेने शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ठेका दिलेला आहे. असे असताना देखील शहरात कचऱ्याचे साम्राज्य वाढल्याचे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये १५ ते २५ दिवस घंटागाडी फिरकत नाही. यामुळे सर्वत्र कचरा पसरलेला पाहण्यास मिळत आहे. यामुळे यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. 

कागदोपत्री नियमित १२५ टन कचरा संकलन   

दरम्यान महापालिकेच्या ७९ घंटागाड्यांपैकी ५७ घंटागाड्या बंद आहेत. तर ३५ पैकी २५ ट्रॅक्टर बंद आहेत. असे असताना कचरा डेपोत नेहमीप्रमाणे सुमारे १२५ टन कचरा टाकला जात असल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. शिवाय केवळ ४४ स्वच्छता कर्मचारी काम करत असताना ठेकेदाराने कागदोपत्री १६४ कर्मचारी दाखवून मनपाची फसवणूक केली असल्याचे म्हणत यात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी 

कचरा संकलनाचा हा भ्रष्ट्राचार मनपाचे अधिकारी, कर्मचारी व कचरा ठेकेदार यांच्या संगनमताने सुरु असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. या भ्रष्टाचारास जबाबदार असलेले मनपाचे स्वच्छता निरीक्षक, वजनकाटा निरीक्षक यांना निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT