Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : सावकाराचा जाच; ३३ वर्षीय शिक्षकाने संपविले जीवन, नातेवाईक आक्रमक

सावकारांचा जाच; ३३ वर्षीय शिक्षकाने संपविले जीवन, नातेवाईक आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : सावकाराकडून पैसे घेतले असल्याने ते परत मिळावे यासाठी सावकाराचा सातत्याने तगादा सुरु होता. (Dhule) सावकाराच्या जाचाला कंटाळून ३३ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना धुळ्यात घडली आहे. यानंतर (Teacher) शिक्षकाचे नातेवाईक आक्रमक झाले असून पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. (Tajya Batmya)

आनंदा रतन चव्हाण (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शिक्षकाचे नाव आहे. आनंदा चव्हाण यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे पैसे परत घेण्यासाठी सावकाराचा तगादा सुरु होता. सावकारांनी पैशांसाठी संबंधित युवा शिक्षकास त्रास दिल्यानेच शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा नातेवाईकांचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. 

नातेवाईकांचा रास्ता रोको 
युवा शिक्षकाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ व नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. संबंधित सावकारांस जोपर्यंत (Police) पोलीस ताब्यात घेऊन कठोरात कठोर शासन होत नाही; तोपर्यंत निजामपूर पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यावर संतप्त नातेवाईक ठाम होते. तसेच  निजामपूर पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनि रास्ता रोको सुरू केला असून पोलीस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT