Dhule news Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : वेळ पडली तर आणखी हुतात्मे देण्याची तयारी; अमित शहांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रतिउत्तर

Dhule news : केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजप सत्तेत असल्यामुळे मुंबई वाचली; असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्राचा आणि गुजरातचा पहिले इतिहास समजून घ्यावा. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, त्यावेळी अमित शहा जन्माला आले नव्हते. १०६ हुतात्मे महाराष्ट्राने दिले आहेत आणि वेळ पडली तर आणखीन हुतात्मे देण्याची आमची तयारी आहे. तेव्हा आम्ही मोरारजी देसाई विरुद्ध लढलो होतो. आता अमित शहा आणि मोदी यांच्या विरुद्ध लढावे लागेल; असे म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजप सत्तेत असल्यामुळे मुंबई वाचली; असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले होते, यावर बोलताना खासदार संजय राऊत (Samjay Raut) यांनी टीका करत अमित शहा यांनी महाराष्ट्र व गुजरातचा इतिहास समजून घेण्याचे सांगितले आहे.  

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) राज्य आल्यानंतर पुढील सहा महिन्यात मोदी पंतप्रधान पदावर नसतील हे खात्रीने सांगतो. कारण केंद्र सरकारला पाठिंबा असलेले चंद्रबाबू नायडू व नितीश कुमार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे पाहतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते पाठिंब्याबाबत नक्की विचार करतील; असेही राऊत म्हणाले.

अजित पवार, शिंदेंची हि शेवटची निवडणूक 
हि निवडणुक शरद पवारांची शेवटची निवडणूक नाही. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही शेवटची निवडणूक आहे. कारण बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे; असे म्हणत अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT