Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : महाराष्ट्रातही मोदी फॉर्मुला चालणार; खासदार संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Dhule News : शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यात कायद्याची भीती संपली आहे. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी आहे; म्हणून कुठलेही कृत्य करताना कुणी घाबरत नाही

भूषण अहिरे

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. केंद्रामध्ये सुद्धा पीए आणि ओएचडी नेमले जाणार आहेत. सर्वात जास्त भ्रष्टाचार या लोकांनी केला. महाराष्ट्रात देखील मोदी फॉर्मुला वापरतील, आता तुमच्या मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी सर्वात जास्त भ्रष्ट आहेत. १०२ नंबर रूम मध्ये झालेला प्रकार याचे उदाहरण आहे; असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

धुळे दौऱ्यावर आलेल्या शिवसेना उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांच्या वाढत्या छळाच्या घटनांवरून राऊत यांनी गेल्या पाच वर्षात लोकांच्या मनातील कायद्याची भीती पूर्ण संपली आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यात कायद्याची भीती संपली आहे. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी आहे; म्हणून कुठलेही कृत्य करताना कुणी घाबरत नाही. त्यांना पाठीशी घालणारे असल्यामुळे हे सर्व प्रकार राज्यात सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी लावला आहे

त्यांच्याकडून सेवेची काय अपेक्षा 

टॅगने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सर्वांनी कचरा केला आहे आणि ते लवकरच कचऱ्यात जातील. मी हे फार जबाबदारीने बोलत आहे. तीन हजार कोटी रुपयांची लाच घेण्याचा प्रकरण न्यायाधीशांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्याकडून तुम्ही सेवेची काय अपेक्षा करतात. कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वांमधून ते पैसे खात आहेत आणि त्यातूनच हे सरकार निर्माण झाले आहे.

गुलाबराव पाटलांवर पलटवार 

मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर राऊत यांनी कोण पांढऱ्या पायाचा, आम्ही अंधश्रद्धा मानत नाही. काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असलेले अशी टीका करतात. तुमचं कर्तुत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेले आहात आणि अमित शहा यांचे तुम्ही अश्रीत आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा असून तुमचा पक्ष हा अमित शहा यांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष आहे; असे म्हणत राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.

नारायण राणे भाजप अश्रित 
नारायण राणे यांच्या वीस प्लस शून्य अशी ठाकरे सेनेची हालत होईल; या वक्तव्यावर राऊत यांनी बोलताना नारायण राणे यांना मी फार किंमत येत नाही. ओव्हर रेटेड आहे तो, नारायण राणे हे भाजपचे अश्रीत आहेत. ते दहा वर्ष काँग्रेस पक्षात होते. २५ वर्ष शिवसेनेत, त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला पण ते चालू होऊ शकले नाही. आता ते भाजप अश्रित आहेत. ब्रिटिश काळात आणि मोघलांच्या काळामध्ये देखील जे स्वतःला राजे समजायचे ते मांडलिक होते, हे देखील भाजपचे अश्रीत आहेत.

मंत्र्यांना मलाईदार खाते हवे 
नागालँडचे आमदार पवार साहेबांकडे आले. नागालँड, मेघालय, मणिपूर, सिक्कीम एक लहान राज्य आहेत आणि इथे पहिले पासूनच महाराष्ट्राचा पैशांचा खेळ सुरू आहे. पैसे घेऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की ते सरळ दुसऱ्या पक्षात जातात. तर आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी खात आणि शिक्षण खातं हे मंत्र्यांना शिक्षा वाटते. मंत्र्यांना मलाईदार खाते हवे आहेत, त्यांना या महत्त्वाच्या खात्यांमध्ये रस नाही; असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT