Sambhajinagar Crime : धक्कादायक! पैशांची मागणी करत पत्नीला घरात डांबले, शोल्डरने दिले चटके; पतीसह नणंदांविरोधात तक्रार

Sambhajinagar News : हिचा पती अजिम शेख हा हिनाकडे वारंवार पैशांची मागणी करत सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. दोन वर्षांपूर्वी पती अजिम शेख याने हिना गर्भवती असताना पोटावर जबर मारहाण
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांची मागणी करत विवाहितेला तिच्या पतीने घरात डांबून ठेवले. तसेच दोरीने बांधून ठेवत शोल्डर गरम करून चटके दिल्याची निर्दयी घटना समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेने फुलंब्री पोलीस ठाण्यात पती व दोन नणंदांविरोधात तक्रार दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौकावाडीत राहणाऱ्या हिना शेख (वय ३०) यांच्यासोबत घडली आहे. हिना शेख हिचे माहेर फुलंब्री असून तिचे चौकावाडी येथे राहणारे अजिम अब्दुल शेख यांच्याशी ८ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान हिना हिचा पती अजिम शेख हा हिनाकडे वारंवार पैशांची मागणी करत सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. हा त्रास कमी होत नव्हता. 

Sambhajinagar Crime
Nursing College Scandal : नाशिक हादरलं! छातीवर, पाठीवर हात फिरवला अन्...प्राचार्याने ४ मुलींचा केला विनयभंग

पतीसह दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल 

इतकेच नाही तर दोन वर्षांपूर्वी पती अजिम शेख याने हिना गर्भवती असताना पोटावर जबर मारहाण करत बाळाला दुखापत केली होती. तर तिला घरात डांबून ठेवत शोल्डरचे चटके देखील दिल्याचे म्हटले आहे. वडिलांनी हिनाला सोबत घेऊन पती अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) व दुसरी नणंद रिजवाना ईमरान शेख यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

Sambhajinagar Crime
Bhiwandi Crime : दरोडा टाकण्याच्या होते तयारीत; पोलिस पथक दाखल होताच उडाली तारांबळ; पाठलाग करत चौघेजण शस्त्रांसह ताब्यात

विवाहितेच्या अंगावर १७ जखमा 

विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अहवालासाठी हिनाला गुरुवारी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याचा वैद्यकीय अहवाल शनिवारी प्राप्त झाला. यामध्ये हिनाला गंभीर इजा असून, तिच्या अंगावर १७ जखमा आढळून आल्या आहेत. आता या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com