धुळे : साक्रीत चाळीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले आणि भाजपने नगरपंचयतीत एकहाती सत्ता काबीज केली. यानंतर आज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. यादरम्यान 17 पैकी अकरा नगरसेवक हे भाजपचे (BJP) असल्यामुळे अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी मात्र मतदान झाले. या निवड प्रक्रीयेत जयश्री पवार यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. (dhule news Sakri Nagar Panchayat Mayor unopposed Selection of Jayashree Pawar)
साक्रीत (Sakri) शंभराहून अधिक पोलीस आणि अधिकारी बंदोबस्तात आहेत. साक्री नगरपंचायतीसाठी 19 जानेवारीला झालेल्या मतमोजणीत १७ पैकी भाजपला ११, शिवसेना ४, काँगेस १ आणि अपक्ष १ जागा आली. त्यामुळे जवळपास ४० वर्षांनंतर साक्री नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर भाजप विराजमान झाल्याने साक्री नगरपंचायतवर (Sakri Nagar Panchayat) भाजपचा झेंडा झळकला आहे. यापूर्वी काँग्रेसची (Congress) एक हाती सत्ता होती. परंतु या निवडणुकी दरम्यान परिवर्तन बघावयास मिळाले आहे.
उपाध्यक्ष पदावर गीते विजयी
नगराध्यक्ष निवड बिनविरोध झाली. परंतु, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे (Shiv sena) भाजपसमोर उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. परंतु अकरा विरुद्ध पाच मतदान झाल्याने उपाध्यक्षपद देखील भाजपच्या पारड्यात पडले आहे. साक्री नगरपंचायतवर नगराध्यक्ष पदासाठी जयश्री पवार यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदासाठी बापू गीते यांची निवड झाली आहे.
१४४ कलम लागू
साक्री नगरपंचायतीच्या मतदान व मतमोजणी दरम्यान झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवड पार पडेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलेला होता. या पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्व दुकानात बंद ठेवण्यात आली. यामुळे संपूर्ण साक्री शहरामध्ये शुकशुकाट बघावयास मिळत होता. पोलीस प्रशासनातर्फे देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.