Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?

Mumbai Mahapalika News : मुंबई महापालिकेने अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून ५ हजार रुपयांची घोषणा केली होती. मात्र अजूनही भेट आणि वेतन न मिळाल्याने सेविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?
Mumbai Mahapalika NewsSaam tV
Published On
Summary

मुंबई महापालिकेने अंगणवाडी सेविकांना ५ हजारांची भाऊबीज भेट जाहीर केली होती

भाऊबीजच्या आधीही भेट आणि वेतन न मिळाल्याने सेविका नाराज आहेत

श्रमिक भारतीय युनियनने आयुक्तांकडे ईमेलद्वारे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे

मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

मुंबई महानगरपालिकेने यंदा अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना दिवाळीनिमित्त ५ हजार रुपये भाऊबीज भेट देण्याची घोषणा केली. घोषणा होण्यापूर्वी एका महिन्यापासून याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, भाऊबीज उद्यावर येऊन ठेपली तरीही अंगणवाडी सेविकांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट आणि वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंगणवाडी सेविकांना तातडीने भाऊबीज भेट आणि वेतन द्यावे, अशी मागणी श्रमिक भारतीय युनियनतर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

दिवाळी जवळ येताच महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेतील सर्वच कर्मचारी संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. त्याचबरोबर, भाऊबीज म्हणून सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार रुपये, तर अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना ५ हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे जाहीर केलं.

Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?
Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

मात्र, ही भेट मिळण्यात विलंब झाल्याचे श्रमिक भारतीय युनियनचे म्हणणे आहे. अंगणवाडी सेविकांचे वेतन दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या आत देण्याचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे, याबाबत युनियनने महापालिका आयुक्तांना ई मेलद्वारे पत्र पाठवले आहे. वेतन देण्यात होणारा विलंब अत्यंत गंभीर बाब आहे. यामागे प्रशासनाची उदासीनता, असंवेदनशीलता आणि दुर्लक्ष दिसून येते, अशी टीका युनियनने केली आहे.

Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?
Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट आणि गेल्या महिन्याचे प्रलंबित वेतन तातडीने द्यावे, शिवाय यापुढे अशा प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी स्पष्ट कार्यपद्धती आणि वेळापत्रक जाहीर करावे, आदी मागण्या युनियनने पत्रात नमूद केल्या आहेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युनियनने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com