Diabetes Symptoms: अचानक वजन वाढतंय, चाललं की दम लागतो? तुम्हाला Diabetes तर नाही ना? लक्षणे जाणून घ्या

Sugar Control: डायबिटीज होण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं. प्री-डायबिटीज ओळखल्यास आणि जीवनशैलीत वेळेत बदल केल्यास या गंभीर आजारापासून पूर्णपणे बचाव करता येतो.
Sugar Control
Diabetes Symptomssaam tv
Published On
Summary

प्री-डायबिटीज हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.

सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

संतुलित आहार, व्यायाम आणि वजन नियंत्रण अत्यावश्यक आहे.

नियमित तपासणीने मोठ्या आजारांपासून बचाव शक्य आहे.

विज्ञान आणि वैद्यकीयशास्त्रात मोठी प्रगती झालेली असली तरी काही आजार अजूनही पूर्णपणे बरे करता येत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे डायबिटीज हा आजार आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (IDF) आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 82.8 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश भारतात आहेत. याशिवाय 25 दशलक्ष लोक प्री-डायबिटीजच्या अवस्थेत आहेत, म्हणजेच त्यांना भविष्यात डायबिटीज होण्याचा धोका अधिक आहे. मात्र, ही अवस्था योग्य वेळी लक्षात घेतली तर टाळता येऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात की शरीरात इन्सुलिन नावाच्या हार्मोनचे कार्य कमी झाल्यास ग्लूकोज योग्यरित्या पेशींमध्ये पोहोचत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. हीच स्थिती प्री-डायबिटीज म्हणून ओळखली जाते. प्री-डायबिटीज ही एक गंभीर आरोग्याची स्थिती आहे. ती वेळेत नियंत्रित न झाल्यास लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकते. या अवस्थेत रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यापेक्षा थोडे जास्त असते. मात्र ते डायबिटीजच्या श्रेणीत येत नाही. डॉक्टर सांगतात की वेळेवर निदान आणि योग्य आहार-व्यायाम यामुळे मोठ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

Sugar Control
Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

प्री-डायबिटीजची लक्षणे बऱ्याच वेळा अस्पष्ट असतात. पण काही संकेत ओळखले जाऊ शकतात. वारंवार भूक किंवा तहान लागणे, थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे किंवा घटणे, पोटाभोवती चरबी वाढणे आणि कुटुंबात डायबिटीजचा इतिहास असणे. या गोष्टी दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांची शारीरिक हालचाल कमी आहे, असंतुलित आहार घेतात किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, अशा लोकांमध्ये प्री-डायबिटीजचा धोका अधिक असतो. तसेच 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, विशेषतः पोटाभोवती चरबी असलेले लोक या अवस्थेसाठी अधिक संवेदनशील असतात.

दर सहा महिन्यांनी फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c तपासणी करावी. आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की धान्य, डाळी, फळे आणि भाज्या यांचा समावेश करावा. तळलेले पदार्थ, गोड पेये आणि जंक फूड टाळावे. दिवसभरात 4 ते 5 वेळा थोडं-थोडं खावे.

Sugar Control
Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Q

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

A

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यापेक्षा थोडं जास्त असतं त्या अवस्थेला प्री-डायबिटीज म्हणतात.

Q

प्री-डायबिटीजची लक्षणे कोणती असतात?

A

वारंवार भूक किंवा तहान लागणे, थकवा, वजन वाढणे किंवा घटणे, पोटाभोवती चरबी वाढणे ही काही संकेत आहेत.

Q

प्री-डायबिटीज टाळण्यासाठी काय करावे?

A

नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण, झोप आणि ताण व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब केल्यास प्री-डायबिटीज टाळता येतो.

Q

डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी तपासणी कधी करावी?

A

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर सहा महिन्यांनी फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com