मृत मोहिनी जाधवची मुलगी पोहचली जाब विचारायला; साक्रीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड

मृत मोहिनी जाधवची मुलगी पोहचली जाब विचारायला; साक्रीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड
sakri nagar panchayat
sakri nagar panchayatsaam tv
Published On

निखील सुर्यवंशी

धुळे : साक्रीत सत्ता परिवर्तन होवून भाजपने नगरपंचयतीत एकहाती सत्ता काबीज केली. मात्र, विजयोत्सवाला अनुचीत घटनेचे ग्रहण लागले. मात्र आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड कडेकोट पोलिस (Police) बंदोबस्तात होत आहे. परंतु, निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी अकरानंतर मृत मोहिनी जाधव हिची मुलगी पल्लवी न्यायाबाबत जाब विचारण्यासाठी साक्री नगरपंचायत (Sakri Nagar Panchayat) कार्यालयाजवळ उपस्थित झाली. (dhule Mohini Jadhav daughter arrives to ask for Jab Election of Sakri Mayor)

sakri nagar panchayat
पत्‍नीने येण्यास दिला नकार; दोन चिमुकल्यांसह तरुणाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

साक्रीत (Sakri) शंभराहून अधिक पोलीस आणि अधिकारी बंदोबस्तात आहेत. साक्री नगरपंचायतीसाठी 19 जानेवारीला झालेल्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पराभूत महिला उमेदवाराचा मुलगा गोटू जगताप हा भाजप (BJP) कार्यालयाजवळ आला. तेथे जगताप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. जगतापला काही भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. ही माहिती जगतापच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे घटनास्थळी जगतापची बहीण, चुलत बहीण मोहिनी जाधव व त्यांची मुले घटनास्थळी आले. त्यांनी गोटू यांना सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जमिनीवर पडून मोहिनी जाधवचा (Mohini Jadhav) मृत्यू झाला.

तिने मांडला ठिय्या

26 जानेवारी आणि त्यानंतर आता निवड प्रक्रियेवेळी गोटू जगताप व परिवाराने न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने साक्रीत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी अकरानंतर मृत मोहिनी जाधव हिची मुलगी पल्लवी न्यायाबाबत जाब विचारण्यासाठी साक्री नगरपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित झाली. तिथे तिने ठिय्या मांडला. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गोटू जगतापला त्याच्या घरातच स्थानबद्ध केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com