mahavikas aaghadi
mahavikas aaghadi 
महाराष्ट्र

महाविकास आघाडीत बिघाडी; राष्‍ट्रवादी– सेनेचा एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय

भूषण अहिरे

धुळे : साक्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्‍याचे पहायला मिळाले. नगरपंचायतीच्‍या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. यात राष्‍ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने सोबत निवडणुक लढायला निर्णय घेतला आहे. (dhule-news-sakri-nagar-panchayat-election-ncp-shiv-sena-decision-to-contest-joint-elections)

साक्री नगरपंचायतच्या १७ जागांसाठी निवडणुक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी चांगलीच गर्दी केल्याचे बघायला मिळाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्रितरीत्या निवडणूक लढण्याचा निर्णय घेत १७ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसने मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडल्याने याचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे दिसून येत आहे.

उद्या अर्जांची छाननी

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावर उद्या छाननी प्रक्रिया पार पडणार असून १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. २१ डिसेंबरला साक्री नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २२ डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: व्हायचं होतं हवाईसुंदरी, पण झाली अभिनेत्री

Bobby Deol: सुलतान बनत बॉबी देओलने दाखवला दम; 'हरि हर वीरा मल्लू' चा टीझर रिलीज

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविषयी पसरल्या होत्या 'या' अफवा, शेवटी तथ्य समोर आलंच!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

Health Tips: भाजके चणे स्नॅक्स म्हणून खा; हृदय निरोगी ठेवा

SCROLL FOR NEXT