धडगाव नगरपंचायतीसाठी ४० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल

धडगाव नगरपंचायतीसाठी ४० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल
dhadgaon nagar panchayat
dhadgaon nagar panchayat

नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव रोषमाळ वडफळया नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आजच्‍या दिवशी चाळीसहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (nandurbar-news-More-than-40-nominations-filed-for-Dhadgaon-Nagar-Panchayat-election)

dhadgaon nagar panchayat
आरटीओ कार्यालयाची बत्‍ती गुल; सर्वच काम खोळंबले

अर्ज दाखल करण्याचा आजचा अंतिम दिवस असल्‍याने अर्ज दाखलसाठी इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अपक्ष तर्फे जवळपास ४० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या पाच वर्षात कॉंग्रेस आणि शिवसेनेने अडीच– अडीच वर्ष सत्ता भोगली असून दोन्ही पक्षांनी १७ जागांवर आपले उमेदवारी अर्ज दाखल करून सत्ता काबीज करण्याचा दावा केला आहे.

कॉंग्रेस– शिवसेनेत लढत

काँग्रेस आणि भाजप मध्ये उमेदवारी न मिळाल्याने अनेक उमेदवारांनी भाजपचा सहारा घेत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याबरोबरच अपक्ष उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. एकूणच धडगाव रोषमाळ वडफळया नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना मित्र पक्षांमध्ये सरळ लढत होत असल्याचे चित्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com