आरटीओ कार्यालयाची बत्‍ती गुल; सर्वच काम खोळंबले

आरटीओ कार्यालयाची बत्‍ती गुल; सर्वच काम खोळंबले
buldhana rto
buldhana rto

बुलढाणा : जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या आरटीओ कार्यलयाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसांपासून हा विद्युत पुरवठा नसल्‍याने कार्यालयातील सर्वच कामे खोळंबली आहे. यामुळे कार्यालयात येत असलेल्‍या नागरीकांना परत जावे लागत आहे. (buldhana-news-RTO-Office-light-connection-cut-last-two-days-All-the-work-was-stop)

buldhana rto
पोटच्या पोराला आईने फेकले विहिरीत; दोन वर्षीय चिमुकल्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू

वीज वितरण कंपनीकडे चौकशी केली असता कुठेतरी फॉल्ट असल्याचे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. याचा फटका वाहन धारकांना सहन करावा लागत आहे. आरटीआ कार्यालयातील वाहन धारकांचे रजिस्‍ट्रेशन, वाहन चालविण्याचा परवाना, लर्निंग लायसन्स यासह सर्व सुविधा देण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून येणारे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

नागरीक येवून जाताय परत

जिल्ह्याची व्याप्ती जास्त असल्याने आरटीओ कार्यालयात कामानिमित्‍त १५० किमी अंतरावरून येणाऱ्या वाहन धारक व सर्व लायसन्स धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठ्याअभावी काम बंद असल्‍याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com