ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भाजलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. याचे सेवन तुम्ही नाश्त्याला पण करू शकता.
शरीराला संतुलित आहार मिळण्यासाठी भाजलेल्या चण्यांचे नियमित प्रमाणात सेवन करा.
भजलेले चणे स्नॅक्ससाठी एक उत्तम पदार्थ मानला जातो. त्याचे तुम्ही अनेक पदार्थ देखील बनवू शकतात.
भाजक्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे भरपूर काळ पोट भरून राहाते.
भाजक्या चण्यांच्या सेवनामुळे वजन नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
भाजक्या चण्यांमुळे शरीराताल चरबी कमी होण्यास मदत होते.
भाजक्या चण्यांमध्ये कॉमप्लेक्स कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते.