निच्‍चांकी तापमानाची नोंद
निच्‍चांकी तापमानाची नोंद 
महाराष्ट्र

धुळ्यात सर्वाधिक निच्‍चांकी तापमानाची नोंद; दोन अंशाने पारा खाली

भूषण अहिरे

धुळे : गेल्या चार-पाच दिवसांपासून देशभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्‍यातील अनेक शहरे गारठली आहेत. आज राज्यामध्ये धुळे (Dhule) जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी ७.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची (Lowest Temperature) नोंद धुळ्यामध्ये करण्यात आली होती. यात दोन अंशाची घसरण झाली आहे. (Dhule-news-recorded-the-lowest-temperature-Mercury-down-by-two-degrees)

गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. आज धुळ्यामध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठल्याचे बघावयास मिळत आहे. उबदार कपडे त्याचबरोबर शेकोटीचा आधार घेत धुळेकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.

आणखी दोन दिवस कडाका

धुळे जिल्ह्यातील तापमान रविवारी ७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात चांगलाच गारठा वाढला होता. यात आज आणखी घसरण झाली आहे. दरम्यान पुढील ४८ तास थंडीचा कडाका असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SCROLL FOR NEXT