Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Lok Sabha Election 2024 : "2024 च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील, तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील" असं मोठं भाकित शरद पवारांनी वर्तवलंय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

प्रवीण देवळेकर

"2024 च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील, तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील" असं मोठं भाकित शरद पवारांनी वर्तवलंय. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे भाकित वर्तवलं आहे. तर "आमच्या पक्षाबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. मात्र,आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नसल्याचंही शरद पवार म्हणालेत. शरद पवारांच्या या भाकितामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. पाहुयात हा रिपोर्ट.

लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असतानाच शरद पवारांनी इंडिया आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण केलंय..2024 च्या लोकसभा निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील, तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं मोठं भाकित शरद पवारांनी वर्तवलंय.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही… वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.

Maharashtra Politics 2024
Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

आता शरद पवारांनी एवढा मोठा संकेत दिल्यानंतर चर्चा तर होणारच. यावर शरद पवारांनी आपल्या पक्षापुरता निर्णय घेण्याचा सूचक सल्ला अजित पवारांनी दिलाय. तर शिंदे-फडणवीसांनी मविआविरोधात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी साधलीय. निवडणूक सुरु असतानाच शरद पवारांच्या भाकितामुळे काँग्रेसचंही मनोबल वाढलंय.. काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. पवारांच्या भाकितानंतर संभ्रम वाढल्यामुळे सुप्रिया सुळेंनी यावर भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काँग्रेसी पक्ष एकत्र येत असताना आता उद्धव ठाकरेंचं काय? हा प्रश्नही चर्चेत आलाय. यावर उद्धव ठाकरेही सकारात्मक असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत.

उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

उद्धव ठाकरे हेदेखील एकत्र काम करण्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहेत. समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत. मी गेल्या काही काळापासून त्यांची विचाराची पद्धत अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत, असे शरद पवार यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेणं पचनी पडत नसल्यामुळे प्रादेशिक पक्ष पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतील असा पवारांचा अंदाज आहे. मात्र ही सर्व राजकीय समीकरणं 2024 च्या लोकसभेचा निकालावर अवलंबून आहेत एवढं नक्की.

Maharashtra Politics 2024
Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com