प्रचाराला मिळाला आणखी एक दिवस; सायंकाळी थंडावणार प्रचार

प्रचाराला मिळाला आणखी एक दिवस; सायंकाळी थंडावणार प्रचार
dhadgaon nagar panchayat
dhadgaon nagar panchayat

नंदुरबार : धडगाव (Dhadgaon) वळफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी एक दिवस अधिक मिळाल्याने आज सायंकाळपर्यंत प्रचार थंडावणार आहे. नगरपंचायतीसाठी उद्या (२१ डिसेंबर) मतदान होणार आहे. (nandurbar-news-The-campaign-got-another-day- Cooling-propaganda-in-the-evening)

dhadgaon nagar panchayat
महिला पोलीस अधिकाऱ्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न; API थोडक्यात वाचल्या

धडगाव वळफळ्या रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी एक दिवस अधिक मिळाल्याने सर्वच पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले आहे. धडगांव वळफळ्या रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित आहे. उद्या (२१ डिसेंबर) १७ जागांसाठी शिवसेना १७, काँग्रेस १७, भाजपा ११, राष्ट्रवादी १ तर अपक्ष दोन असे एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी तिरंगी लढत होत आहे.

धडगांव नगरपंचायत निवडणूकीत अनेक पक्षाच्यावतीने स्टार प्रचारक यांनी प्रचार रॅली, जाहीर सभा घेऊन आपल्या पक्षाचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान धडगांव वळफळ्या रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी आज (ता.२०) सायंकाळपर्यंत प्रचाराची वेळ वाढवण्यात आली असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आला आहे. उद्या सकाळी ७.३० पासून मतदानास सुरुवात होणार आहे. जवळपास ९ हजार मतदार असुन निवडणूक सुस्थितीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com