Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: खाजगी ट्रॅव्हल्समध्ये लाखोंचा गुटखा; १७ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये लाखोंचा गुटखा; १७ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

भूषण अहिरे

धुळे : काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ट्रॅव्हल बसला आग लागल्याच्या घटने दरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ट्रॅव्हल बसमधून गुंगीकारक पदार्थांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा उघडकीस आणला होता. त्यानंतर धुळ्यात (Dhule) खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. (Tajya Batmya)

खाजगी ट्रॅव्हल बसमधून अवैधपणे गुटखा पान मसाला त्याचबरोबर नशेच्या वस्तू वाहतूक केली जात असल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धुळे (Dhule News) शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्‍याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती.

१७ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता त्या दरम्यान संबंधित माहिती मिळालेली ट्रॅव्हल्स पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आला. या कारवाईदरम्यान जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून ट्रॅव्हल्स चालक व वाहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT