Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : कॅफेवर पोलिसांची धाड; अश्लील चाळे करणारे तरुण- तरुणी ताब्यात

Dhule News : धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाजवळ एका कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण- तुरुणींकडून अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

भूषण अहिरे

धुळे : महाविद्यालयीन तरुण- तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी एकांत मिळावा या हेतूने तयार केलेल्या कॅफेवर (Police) पोलिसांनी धाड टाकली. या कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या महाविद्यालयातील (Dhule) तरुण- तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कॅफे मालकाची देखील चौकशी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाजवळ एका कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण- तुरुणींकडून अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती पोलिसांना (Dhule Police) मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी पोलिसांनी पथकासह धाड (Police Raid) टाकत कॅफेची तपासणी केली. त्यामध्ये आठ तरुण व आठ कॉलेज तरुणी या संबंधित कॅफेवर अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॅफे मालकावरही कारवाई 

पोलिसांनी कॅफेवर टाकलेल्या धाडमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. तसेच कॅफे मालकावर देखील या संदर्भात देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. कॅफेमध्ये उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

SCROLL FOR NEXT