Anil Gote Saam tv
महाराष्ट्र

Anil Gote News : जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा योजनाबध्द कट; अनिल गोटे यांचा निशाणा

भूषण अहिरे

धुळे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा योजनाबध्द आणि पध्दतशिर कट सुरू असल्याच म्हणत, (Dhule) धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी पत्रकाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  (Tajya Batmya)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ऍडजस्ट होणार नाही, हे लक्षात आल्यामुळेच मराठा आंदोलनाच्या विरोधी असलेल्या सुर्याजी पिसाळ तसेच मंथरेला ऍडजस्ट करुन बाहेर काढले. तसेच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची तीव्रता वाढल्याने राज्य सरकारला एक दिवसाचे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय करावा लागला होता. जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला बदनाम करण्याकरीता ओबीसीच्या नेत्याकडून जरांगे पाटील यांना मजबूत दुषणे देवून झाली. पण जरांगे पाटील तूसभरही मागे न हटल्यामुळे अखेर मुख्यमंत्र्याना निर्णय घेणे भाग पडले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता बघितल्यानंतर मी यापूर्वीच मराठा आंदोलकांना सावध केले होते की हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसेच होत असल्याचे म्हणत, गोटे यांनी मराठा आंदोलकांना विनंती केली आहे, अशा कुठल्याही अपप्रचाराला मेहरबानी करुन बळी पडू नका, पुन्हा अशी संधी चालून येणे नाही. त्याचबरोबर शरद पवार, उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख करुन सत्तारुढ महायुतीने हलकटपणाची पातळी गाठली असल्याचा देखील उल्लेख परिपत्रकात गोटे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT