Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गुंगीकारक औषधाच्या साठ्यासह एक ताब्‍यात

गुंगीकारक औषधाच्या साठ्यासह एक ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील आझादनगर पोलिसांना मिळालेल्‍या माहितीनुसार कारवाई केली आहे. यात मानवी (Dhule News) मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीची औषधी सोबत असलेल्‍या इसमास पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून सुमारे ४० बाटल्‍या जप्‍त केल्‍या आहेत. (Latest Marathi News)

धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नटराज टॉकी परिसरामध्ये एक अज्ञात इसम आपल्यासोबत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. या दरम्यान संबंधित इसम काटेरी झुडपामध्ये कोरेक्स या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधाचा साठा घेऊन असल्याचे पोलिसांना आढळून आले.

४० बाटल्‍या जप्‍त

पोलिसांनी तात्काळ संबंधिताला ताब्यात घेत त्याची तपासणी केली. त्याच्याकडे कोरेक्स या औषधाच्या जवळपास ४० बाटल्या पोलिसांना आढळून आल्या आहेत. या इसमाविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT