
Washim News : गरज ही शोधाची जननही आहे. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. परिस्थितीवर मात करत एका पित्याने लेकाचं बाईक घेण्याचं स्वप्न स्वप्न पूर्ण केले आहे. या पित्याने अनोखा जुगाड करत चक्क भंगार वस्तुंपासून दुचाकी (Desi jugaad) तयार केली आहे. वाशिमध्ये (Washim News) तयार करण्यात आलेल्या या बाईकची जोरदार चर्चा होत आहे. (Maharashtra News)
वाशिम जिल्ह्यातील करंजा येथील राहणाऱ्या शाफीन खान हा घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. पण, त्याचे मित्र मात्र मोटरसायकलने कॉलेजला येत असत. आपल्या मुलाने देखील बाईकवर कॉलेजला जावे; अशी या पित्याची इच्छा होती. मात्र, बाईक खरेदी करायला पैसे नव्हते. नवीन बाईक घेणे इतके पैसे नसल्याने त्यांनी जुगाड करून भंगार साहित्यापासून ई- बाईक बनवली. या बाईकला आगळावेगळा लूक दिला. ही बाईक पाहून त्यांच्या मुलाला वेगळाच आनंद मिळाला. शाफीन आता रोज याच बाईकने कॉलेजला ये-जा करतो.
केवळ वीस हजाराचा खर्च
मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं. तर करंजामदील शाफीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च भंगाराच्या साहित्यापासून ही (E Bike) ई-बाईक बनवली. या बाईकचा लुक अत्यंत आगळा-वेगळा असा आहे. लाखो रुपयांच्या बाईक वापरणाऱ्या शफीनच्या मित्रांनाही आता त्याच्या हा जुगाड बाईकची राईड घेण्याचा मोह आवरत नाही. ही बाईक बनवण्यासाठी रहीम खान यांना फक्त वीस हजार रुपयांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.