Beed News: क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली नोकरदाराला, तर पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला सायबर भामट्यांनी गंडा घातलाय. बीड (Beed) जिल्ह्यात झालेल्या या प्रकारात (Cyber Crime) सायबर गुन्हेगारांनी दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून ७५ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. (Live Marathi News)
बीडच्या गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील भारत हिराभाऊ काळे हे नोकरी करतात. त्यांना तुमच्या क्रेडिट कार्डवर दररोज ५०० रुपये देण्याची योजना सुरू झाली आहे. ती बंद करण्यासाठी कॉल करून ओटीपी मागितला. काळे यांनी ओटीपी देताच त्यांच्या खात्यावरील ४९ हजार १३१ रुपये कमी झाले. त्याचबरोबर नीलेश जनार्धन वाघमारे (रा. लाव्हरी, ता. केज) या व्यापाऱ्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कॉल आला होता. त्यांनी लिंक ओपन करून ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातूनही २४ हजार ९९ रुपये कमी झाले आहेत. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे, की ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा. कोणतीही लिंक क्लिक करू नका. कोणालाही आपला ओटीपी सांगू नका. मात्र तरीही नागरिकांकडून याची काळजी घेतली जात नसल्याने ऑनलाइन फसवणूक होण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे आता स्वतःहून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.