OBC Reservation Saam tv
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणप्रश्‍नी राज्य सरकारचे झोपेचे सोंग; भाजपतर्फे धुळ्यात निषेध

ओबीसी आरक्षणप्रश्‍नी राज्य सरकारचे झोपेचे सोंग; भाजपतर्फे धुळ्यात निषेध

साम टिव्ही ब्युरो

धुळे : ओबीसी आरक्षणप्रश्‍नी राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेली अडीच वर्ष कुंभर्णाप्रमाणे झोपेचे सोंग घेऊन ओबीसी समाजाच्या राजकीय आरणाचा गळा घोटत आहे असा आरोप करत भाजप (BJP) ओबीसी मोर्चाने महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. (dhule news OBC reservation issue BJP protests in Dhule)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी ट्रिपल टेस्ट करा असे सांगत आहेत. मात्र आघाडी सरकार १७ नंबरचा फॉर्म भरून पास झाल्याप्रमाणे वागत आहे. सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) निरगुडे आयोग नेमला. आयोगाला ४५३ कोटी रुपये फक्त जाहीर केले मात्र आयोगाला दमडीही न दिल्यामुळे आयोगाने सरकारी दप्तरातला डेटा अर्धवट व विनास्वाक्षरी पुढे पाठवून दिला. यातून एकप्रकारे ओबीसी समाजाबाबत अनास्था दाखवल्याचे भाजप ओबीसी आघाडीने म्हटले आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने पूर्णपणे लक्ष देऊन इम्पेरिकल डेटा डेटा व ट्रिपल टेस्ट पूर्ण करून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवले. मात्र त्यानंतरही भाजपाशासित राज्य असल्यामुळे मध्य प्रदेशला ते मिळाल्याची आरोळी ठोकली जात आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी राज्य सरकारची गत असल्याची टिका करत भाजप ओबीसी मोर्चाने राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात भाजप राजवर्धन कदमबांडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल, युवराज पाटील, भारती माळी, प्रतिभा चौधरी, विक्की परदेशी, प्रा. सागर चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा यात सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT