Shobha Bacchav Saam tv
महाराष्ट्र

Shobha Bacchav : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढणार; खासदार शोभा बच्छाव यांनी दिले संकेत

Dhule News : धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार शोभा बच्छाव आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यास सांगितले

भूषण अहिरे

धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धुळ्यात महाविकास आघाडी एकत्र या निवडणुका लढणार असल्याचे संकेत खासदार शोभा बच्छाव यांनी दिले आहेत. वरिष्ठ पातळीवरून त्या प्रकारचे आदेश आम्हाला मिळाले असल्याचे देखील खासदार शोभा बच्छाव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात मविआ सोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार शोभा बच्छाव आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यास सांगितले. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशात धुळ्यात काय चित्र राहणार याबाबत चर्चा होती. मात्र खासदार बच्छाव यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. 

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. यादरम्यान महाविकास आघाडी एकत्र लढणार की आपसामध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार; याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले होते. मात्र धुळे लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव त्यांनी धुळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्यापाऱ्यांसोबत बैठक 

धुळे शहरातील उद्योग व व्यापारी क्षेत्रातील अडचणी जाणून घेण्यासाठी व्यापारी महासंघाच्या पारोळा रोड येथील कार्यालयात खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, खराब खांब व विद्युत तारा, रस्त्यांची दुरवस्था, टोलमाफीचा अभाव, एमआयडीसीत पोलीस ठाण्याची आवश्यकता, तसेच अवैध दारू विक्रीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी यांसारखे प्रश्न मांडण्यात आले आहे. खासदार बच्छाव यांनी समस्या गांभीर्याने ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT