Dhule Corporation School Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Dhule news : स्पर्धेच्या युगात मुलांना दर्जेदार शिक्षणसाठी बहुतांश पालक मुलांना खासगी इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये टाकत असतात. यामुळे पालिका व जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती

भूषण अहिरे

धुळे : महापालिका, जिल्हा परिषदेच्या वाचविण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. अशातच धुळे शहरात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात महापालिकेच्या असलेल्या ६५ मराठी शाळांपैकी तब्बल ४५ शाळा बंद झाल्या आहेत. तर उर्वरित सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ शाळा उर्दू माध्यमाच्या तर फक्त ७ शाळा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे.   

विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळा सुरु करण्यात येतात. मात्र धुळ्यातील मराठी शाळांचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दरम्यान स्पर्धेच्या युगात मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी बहुतांश पालक आपल्या मुलांना खासगी इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये टाकत असतात. यामुळे पालिका व जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शाळा बंद पडत आहेत. 

लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष 

एकेकाळी धुळ्यात खाजगी शाळांपेक्षा जास्त पटसंख्या या महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत असायची. मात्र आता परिस्थिती अवघड झाली आहे. धुळे शहरात खाजगी शाळांचा सुळसुळाट वाढला आहे. तर महापालिकेच्या गुणवत्ता आणि सोयी सुविधा बघता पालकांनी मुलांना खाजगी शाळेत शिकवण्याची पसंती दर्शविली आहे. गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निर्माण होत आहे. यामुळेच मराठी माध्यमाच्या तब्बल ४५ शाळा बंद झाल्या. मात्र कुठल्याच लोकप्रतिनिधींना याबाबत काही एक घेणेदेणे नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

त्या शाळांचीही दुरावस्था 

दरम्यान राज्यात मराठी हिंदी भाषेचा वादंग सुरु असतांनाच धुळे शहरात महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या तब्बल ४५ शाळा बंद पडल्याचे समोर आले आहे. तर सुरु असलेल्या २० शाळांपैकी देखील काही शाळांचे बांधकाम जुने असल्याने शाळांची दुरवस्था झाली आहे. २० शाळांपैकी काही शाळांमध्ये पावसात गळत असलेल्या वर्गखोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. अर्थात मराठी भाषे संदर्भात राज्यात देखील वाद होत असले तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरु असलेल्या मराठी शाळेची ही अवस्था म्हणजे दुर्देव म्हणाले लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईत भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

SCROLL FOR NEXT