Dhule News Saam tv
महाराष्ट्र

महावितरण अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी कोंडले कार्यालयात

महावितरण अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी कोंडले कार्यालयात

भूषण अहिरे

धुळे : उन्‍हाळ्याचे दिवस असताना वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याबाबत वारंवार सांगितल्‍यानंतर देखील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभार सुरू आहे. या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. बाहेरून कुलूप लावून वीज वितरण (MSEDCL) कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. (dhule news MSEDCL officials were harassed by the corporators in the office)

गेल्‍या काही दिवसांपासून (Temperature) तापमान ४० अंशाच्‍यावर पोहचले आहे. यात उकाडा देखील वाढला आहे. असे असताना कडाक्याच्या उन्हात देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नगरसेवक संतप्त झाले.

मनमानी कारभाराविरोधात घोषणा

वीजपुरवठा खंडित झाल्याचे कळवून देखील वीज वितरण विभागातर्फे दखल घेतली जात नाही. यामुळे नगरसेवकांनी आक्रमक पाऊल उचलत थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. येथे आल्‍यावर कार्यालयात अधिकाऱ्यांना (Dhule News) कोंडून बाहेर सर्व नगरसेवकांनी वीज वितरण अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारा विरोधात घोषणा दिल्या.

सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन

संबंधित अधिकाऱ्यांनी विनवणी केल्यानंतर कार्यालयाचा दरवाजा खोलण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी संतप्त सर्वपक्षीय नगरसेवकांना यासंदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. मात्र यापुढे वीज वितरण विभागाचा मनमानी कारभार आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT