Sanjay raut, Eknath Shinde  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'आमदार, खासदार फोडण्यासाठी दिल्लीतून निधी...' संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

Maharashtra Politics: आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी असा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे," असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. ७ जानेवारी २०२४

Sanjay Raut News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत मुजरा करायला जातात, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुजरा करायला जात नाही तर निधी आणण्यासाठी जातो, असे उत्तर दिले. यावरुनच पुन्हा एकदा संजय राऊत धुळ्यामध्ये यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देन्याइतके ते मोठे नाहीत ते मुख्यमंत्री जरूर आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच दिल्लीतून यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोपही राऊतांनी केला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी असा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे," असे ते म्हणाले.

बावनकुळेंना टोला...

"जानेवारीमध्ये मोठा भूकंप होणार असल्याच बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, " ते स्वतःपासून बोलत आहेत. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. 10 तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे.'

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारतर्फे महाराष्ट्राची लूट

राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये, नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटीची तिजोरी कोणी लुटलीय़ असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला. तसेच राज्य सरकारतर्फे महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी लावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगभरातील सर्वात प्राचीन शहर कोणते? जाणून घ्या ऐतिहासिक शहरांचे रहस्य

Kunickaa-Kumar Sanu: 'त्यांच नातं टॉक्सिक...'; कुनिका सदानंद आणि कुमार सानूच्या अफेअरवर मुलगा अयान लाल स्पष्टचं म्हणाला

Blood sugar spike: रक्तातील साखर झपाट्याने वाढली तर काय कराल? घरच्या घरी या सोप्या पद्धतींचा करा वापर

Maharashtra Live News Update: राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक होणार - मुख्यमंत्री फडणवीस

Laxman Hake : बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT