Sanjay Raut News: 'रखडलेल्या निवडणुका घ्या; नाहीतर रस्त्यावर उतरून दोन हात करा...' राऊतांचे भाजपला थेट आव्हान

Maharashtra Politics: सध्या सुरू असलेले ईडी, बीडी, सीडी हे सर्व दिल्लीचे कारस्थान आहे. 2024 मध्ये राज्य आपल्या हाती येत आहे," असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Sanjay Raut Todays news
Sanjay Raut Todays news Saam TV
Published On

Sanjay Raut News:

धुळ्याध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरून दोन हात करा, बिळात जरी लपलात तरी शोधून बाहेर काढू.. असे राऊत यावेळी म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

धुळ्यामध्ये (Dhule) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घ्या नाहीतर रस्त्यावर उतरून दोन हात करा.. असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले.

2024 मध्ये राज्य आपल्या हाती..

त्याचबरोबर "महाराष्ट्रामध्ये राजकीय महाभारत घडवल्याशिवाय दिल्लीच्या (Delhi) चाव्या आपल्याकडे येणार नाहीत. सध्या सुरू असलेले ईडी, बीडी, सीडी हे सर्व दिल्लीचे कारस्थान आहे. 2024 मध्ये राज्य आपल्या हाती येत आहे," असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut Todays news
Manoj jarange Patil: '२०० जेसीबी आमच्या घामाचे, ओबीसीमधूनच आरक्षण घेणार...' जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार!

हा ईव्हीएमचा विजय

यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईव्हीएम मशीन वरुनही भाजपवर निशाणा साधला आहे, "हा काही मोदींचा विजय नसून हा ईव्हीएमचा विजय आहे. जगातील इतर देशांमध्ये ईव्हीएमला नाकारण्यात आले आहे. बांगलादेश हा ईव्हीएमवर निवडणूक घेणारा शेवटचा देश असून, त्याने देखील बायलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सुरुवात केली आहे, आणि त्यानंतर आता भारताचा नंबर आहे..." असे राऊत म्हणाले.

ईव्हीएम मशिनशिवाय निवडणुका लढवण्याचे आव्हान..

तसेच "एकदा तरी एक निवडणूक ईव्हीएम विना घेऊन दाखवा, तुम्ही धुळ्याची ग्रामपंचायत देखील भाजप जिंकू शकणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी बिना एव्हीएम तुम्ही सांगाल तिथे निवडणूक घ्या," असे म्हणत भाजपला ईव्हीएम मशीन विना निवडणुका लढवण्याचे आव्हानही राऊतांनी केले. (Latest Marathi News)

Sanjay Raut Todays news
Corona Update: सावधान! दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या दीडशे पार, जेएन-१ च्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com