Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : मोटरसायकल, बॅटऱ्या चोरी करणारी टोळी ताब्यात; मुद्देमाल केला हस्तगत

Dhule News : गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर व परिसरातून मोटरसायकल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर्स व बॅटऱ्या चोरी करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत होत्या. या शिवाय शेतशिवारातून विद्युत मोटारी, बॅटरी चोरी झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे (Dhule Police) फिरवली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी श्रीराम पवार यांना गुप्त माहिती द्वारा मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कारवाई केली.  

सात जण ताब्यात 

या दरम्यान सात जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल, एक बॅटरी आणि सहा जलपरी पाण्याची मोटर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाई प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

Smartphone: तुमच्या मोबाइलचं नेटवर्क सारखं गायब होतंय...या सोप्या ट्रिक वापरा

Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी आठवडाभर बनवा या युनिक स्वादिष्ट पदार्थ

SCROLL FOR NEXT