धुळे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत उठविलेल्या आवाजानंतर राज्यभरात त्याचे पडसाद पहायला मिळत आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा पठन करण्यात आली. यानंतर आज धुळ्यात (Dhule) सकाळी मशिदीमध्ये भोंग्याविनाच अजान झाली. (dhule news mosques of Dhule without speeker morning azan)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापुढे देखील मशिदीवरील लागलेल्या भोंग्याद्वारे नमाज पठण झाली; तर त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर धुळे पोलीस (Police) सज्ज झाल्याचे बघावयास मिळत आहे. कालच्या तुलनेमध्ये आज जवळपास ९० टक्के मस्जिदींवर पहाटेची अजान भोंग्यांविनाच पार पडली आहे.
सकाळपासूनच पोलिसांचा फौजफाटा
शहरातील सर्व मशिदींबाहेर पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.