मनसेच्या आंदोलनानंतर मुंबईतील २६ मशिदींनी घेतला मोठा निर्णय

भोंग्याविरोधात काल ४ मेपासून मनसेने राज्यभर आंदोनल सुरु केले आहे.
Bhonga
Bhonga Saam tv
Published On

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील (masjid) भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला होता. भोंग्याविरोधात काल ४ मेपासून मनसेने राज्यभर आंदोनल सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ मशिदींनी लाऊडस्पीकर शिवाय अजानाचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुस्लीम धर्मगुरूंनी लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या अजानबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय दिली जाणार आहे. मनसेच्या (MNS) पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. जिथे भोंगा वाजेल त्यासमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता.

Bhonga
Aurangabad Sabha | राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, राज ठाकरे प्रमुख आरोपी, पाहा हे प्रकरण

मुंबईतील प्रसिद्ध सुन्नी बादी मस्जिद मदनपुरा आणि मिनारा मशिदीने निर्णय घेतला आहे. इथेही लाऊडस्पीकरशिवाय अजान दिली जात आहे, दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरूंनी बुधवारी उशिरा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आता सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय दिली जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असं यात म्हटलं आहे.

हे देखील पाहा

१३५ मशिदींवर कारवाई होणार का?

'राज्यात ९० ते ९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. आमची लोकं तयारच होती. पण मी खासकरून ज्या मशिदींमध्ये मौलवी असतील त्यांचे आभार मानेन. आमचा विषय त्यांना नीट समजला, असंही ठाकरे म्हणाले. भोंग्याविषयी मुंबईचा अहवाल आला आहे. त्याप्रमाणे मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींवर सकाळची अजान पाचच्या आत लावली आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा काल मला फोन आला होता. सर्व मौलवींशी बोललो आहोत, कुणी अजान लावणार नाहीत, असे त्यांनी सांगितले होते. ज्या मशिदीवर अजान झाली, त्यांच्यावर राज्य सरकार काय कारवाई करणार आहे का, की आमच्याच लोकांना ताब्यात घेणार आहेत, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोलिसांना केला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com