Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रकार

Dhule News : वर्षभरापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. चौकशीत मांसाहारी जेवण, यानंतर खिर खाल्ल्यामुळे आणि त्या कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे असा प्रकार घडल्याचा निष्कर्ष निघाला होता.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील शंभराहुन अधिक प्रशिक्षणार्थीं पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याचा (Dhule) अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित जवानांना तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात सहाशे प्रशिक्षणार्थी आहेत. या सर्वांनी १४ मार्चला सायंकाळी सातनंतर जेवण केले. यानंतर येथील शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थींना मळमळ, उलटी, जुलाब असा त्रास जाणवू लागला. (Dhule Police) त्यामुळे प्राचार्य विजय पवार यांनी यंत्रणेच्या मदतीने शंभरावर प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले. यानंतर सर्व प्रशिणार्थींवर रात्री उपचार करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. चौकशीत मांसाहारी जेवण, यानंतर खिर खाल्ल्यामुळे आणि त्या कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे असा प्रकार घडल्याचा निष्कर्ष निघाला होता. (Police) पोलिस प्रशिक्षण केंद्रातील गुरुवारी घडलेला प्रकार कशामुळे झाला याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

SCROLL FOR NEXT