Dhule News Kunal Patil Abdul Sattar Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले; आमदार कुणाल पाटील

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले; आमदार कुणाल पाटील

भूषण अहिरे

धुळे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात अधिवेशनात दोन दिवसात घोषणा होणार असल्याचे (Abdul Sattar) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यात अवकाळी नुकसान पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन संपले तरी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी संदर्भात घोषणा करण्यात आली नाही. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याची भावना काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व्‍यक्‍त केली. (Live Marathi News)

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांनी व कृषिमंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी लावला आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी २२ मार्चला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. या दौरादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी नुकसानी संदर्भात घोषणा करण्यात येईल; असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पुढील दोन दिवस शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लागून राहिले होते. परंतु अधिवेशन संपले तरी देखील कृषिमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अवकाळी नुकसानी संदर्भात कुठलीही घोषणा अधिवेशनात करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT