घरगुती गॅस 
महाराष्ट्र

घरगुती गॅसचा गैरवापर; दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

घरगुती गॅसचा गैरवापर; दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. ब्‍लॅकमध्‍ये गॅस सिलेंडर दिले जातात. असाच प्रकार समोर आला असून धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघा इसमांना पोलिसांनी रंगेहात पकडले. (dhule-news-Misuse-of-domestic-gas-dhule-police-Both-are-under-custody)

धुळे शहरामध्ये चाळीसगाव रोड परिसरामध्ये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्युनिसिपल कार्पोरेशन शाळा क्रमांक ५१,५२ च्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये काही ईसम हे घरगुती गॅस वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची माहिती गुप्त माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्यावेळी पोलिसांना एका ऑटो रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या टाकीतून गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच ठिकाणी एक ऍपेरिक्षा देखील पोलिसांना आढळून आली आहे.

२७ सिलेंडर भरलेले

ॲपेरिक्षा व ऑटो रिक्षासह तब्बल तीस घरगुती गॅसच्या टाक्या ज्यामध्ये २७ गॅसच्या टाक्या भरलेल्या व तीन टाक्या या अर्धवट भरलेल्या पोलिसांना आढळून आल्या. या कारवाईमध्ये जवळपास चार लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईदरम्यान दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतक्या मोठ्या संख्येने घरगुती गॅसच्या टाक्या या दोघां ईसमांकडे कुठून आल्यात याचा देखील तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

SCROLL FOR NEXT