Dhule MIM Saam tv
महाराष्ट्र

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

Dhule News : समस्या सुटत नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्याकडे सादर केला आहे. यामुळे धुळ्यात एमआयएमची ताकद कमी झाल्याचं बोललं जात आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर मतदार संघात मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचा आमदार निवडून आला होता. यावेळी मात्र पक्षाला यश मिळाले नसून यानंतर आता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण एमआयएम पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 

धुळे शहरात एमआयएमला चांगले दिवस आले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत फारूक शाह हे एमआयएम पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर आता एमआयएम पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला आहे. 

सामूहिक राजीनामे देत सोडला पक्ष 

एमआयएम पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने एक सोबतच पक्षाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने धुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएम पक्षाच्या धुळे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याने एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यात जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दिपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

वरिष्ठ नेत्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी 
दरम्यान ​पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आलं आहे. लोकांच्या समस्यांवर लक्ष न दिल्याने स्थानिक जनतेमध्ये नाराजी होती. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं पदाधिकार्याचे म्हणणे आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्याकडे सादर केला आहे. या घडामोडीमुळे धुळ्यात एमआयएमची ताकद कमी झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्यातील 15 सरपंचांचा सन्मान होणार; कुणाला मिळाला मान?

Thursday Horoscope : या राशीच्या व्यक्तीनी प्रवास करताना राहा सावध, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Dahi Handi : दहीहंडी फोडणार आहात? मग अपघात टाळण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT