Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धुळ्याच्या नकाने तलाव परिसरात बिबट्या जेरबंद; अनेक दिवसांपासून परिसरात होता वावर

Dhule News : धुळे शहरापासून जवळ असलेल्या नकाने तलाव परिसरात बिबट्या फिरत होता. अनेकदा हा बिबट्या नागरीक व शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडला होता

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहराजवळील असलेल्या नकाने तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी नागरिकांच्या निदर्शनास पडत असलेला बिबट्या नकाने तलाव परिसरामध्ये सर्रासपणे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान आज हा बिबट्या जेरबंद झाला आहे.  

धुळे (Dhule) शहरापासून जवळ असलेल्या नकाने तलाव परिसरात बिबट्या फिरत होता. अनेकदा हा बिबट्या नागरीक व शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या परिसरामध्ये नागरिक वावरताना जीव मुठीत धरून वावरत होते. या संदर्भात वन विभागास परिसरातील नागरिकांनी (Leopard) बिबट्या फिरत असल्याची माहिती देण्यात आली होती. वन विभागातर्फे देखील बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी पिंजरा देखील लावण्यात आला होता.  

वन विभागाकडून (forest department) आसाराम बापू आश्रमाजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अखेर आज बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाच्या जवानांना यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आता कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगण्याचे आवाहन वन विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडण्यात येईल; अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Alert : राज्यात कडाक्याची थंडी, पुढील २४ तास महत्त्वाचे; वाचा हवामान खात्याचा अंदाज

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार? वाचा

Gupt Navratri: गुप्त नवरात्रीचा दुसरा दिवस आज; पाहा आजच्या पंचांगात काय विशेष?

Maharashtra Live News Update: बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? - शेळके

Pav Recipe : बेकरीसारखा मऊ-लुसलुशीत पाव घरी कसा बनवावा? 'ही' आहे एकदम सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT