Kirit Somaiya Uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya News : मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेचे अस्तित्व नसणार; किरीट सोमय्या यांचा दावा

Dhule News : राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. अर्थात या निवडणुकीत शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे सेना व ठाकरेंची सेना यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. मात्र ठाकरेंच्या सेनेला कमी जागा मिळाल्या आहेत.

भूषण अहिरे

धुळे : विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत आहे. मात्र निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नसेल; असा धक्कादायक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. धुळे येथे आले असताना माध्यमांशी बोलतांना सोमय्या यांनी हा दावा केला आहे.  

राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. अर्थात या निवडणुकीत शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे सेना व ठाकरेंची सेना यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. मात्र ठाकरेंच्या सेनेला कमी जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. त्याच अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी ठाकरे सेनेवर निशाणा साधला आहे. 

ठाकरेंचा पक्ष शेवटच्या घटका मोजतोय 

ठाकरेंच्या सेनेला विधानसभेत कमी मिळालेल्या जागांवरून सोमय्या यांनी निशाणा साधत म्हटले आहे, कि राम शेवटच्या घटका मोजत असतानाच आठवतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा पक्ष शेवटच्या घटका मोजत असल्यामुळेच त्यांना राम आठवल्याची कोपरखळी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लगावली आहे.

वोट जिहादचा भांडाफोड करणार 

तसेच यावेळी किरीट सोमय्या यांनी वोट जिहाद करण्यासाठी दुबईहून १०० कोटी रुपयांची फंडिंग आल्याचाही आरोप केला आहे. या वोट जिहाद प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचे देखील त्यांनी या वेळेस सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा - अमित शहा

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT