Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Surabhi Jayashree Jagdish

पत्नीला पुरेसा वेळ न देणे

अनेक पुरुष कामाच्या व्यापामुळे पत्नीसोबत दर्जेदार वेळ घालवू शकत नाहीत. त्यामुळे पत्नीला दुर्लक्षित असल्याची भावना निर्माण होऊ शकते. नातं घट्ट ठेवण्यासाठी नियमित संवाद आणि एकत्र वेळ घालवणं आवश्यक असतं.

Wife Expectations | SAAM TV

मनमोकळा संवाद न साधणं

काही पती आपल्या भावना किंवा अडचणी पत्नीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. तसंच पत्नीचं म्हणणं शांतपणे ऐकण्याकडेही ते दुर्लक्ष करतात. यामुळे गैरसमज वाढून नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

Married Life | SAAM TV

मुलांच्या जबाबदारीत सहकार्य न करणं

मुलांची जबाबदारी ही आई-वडील दोघांचीही समान असते. मात्र काही नवरे मुलांच्या संगोपनात किंवा दैनंदिन कामांमध्ये फारसा सहभाग घेत नाहीत. त्यामुळे पत्नीवर अतिरिक्त ताण येतो आणि तिची चिडचिड वाढू शकते.

Communication in Marriage | SAAM TV

गोष्टी लपवण्याची सवय

काही जण आर्थिक व्यवहार, मित्रमंडळी किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी पत्नीपासून लपवतात. अशा सवयीमुळे विश्वास कमी होण्याची शक्यता असते. नात्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Trust in Relationship | SAAM TV

पत्नीच्या कामाचं कौतुक न करणं

घरातील किंवा नोकरीतील पत्नीच्या मेहनतीची दखल न घेतल्यास तिला वाईट वाटू शकतं. तिच्या प्रयत्नांचं साधं कौतुकही तिचा आत्मविश्वास वाढवू शकतं. सतत दुर्लक्ष झाल्यास नाराजी आणि चिडचिड वाढू शकते.

Couple Goals | SAAM TV

पत्नीच्या भावना न समजून घेणं

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या भावना आणि गरजांचा आदर करणं आवश्यक असतं. काही नवरे पत्नीच्या भावनिक अपेक्षांकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे पत्नीला तिचं महत्त्व कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते.

Family Relationship | SAAM TV

नात्यात परस्पर कौतुकाची कमतरता

पती-पत्नीने एकमेकांच्या कामाचं आणि प्रयत्नांचं वेळोवेळी कौतुक करणं गरजेचं असतं. केवळ पत्नीनेच समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. परस्पर आदर, कौतुक आणि सहकार्य यामुळे नातं अधिक मजबूत आणि आनंदी राहू शकतं.

Respect in Marriage | SAAM TV

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

numbness in legs | SAAM TV
येथे क्लिक करा