marriage 
महाराष्ट्र

आदर्श विवाह..तीन मुलांसह विधवा वहिनीला स्‍वीकारले

आदर्श विवाह..तीन मुलांसह विधवा वहिनीला स्‍वीकारले

भूषण अहिरे

धुळे : करंके कुटुंबीयांतील आई व मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यात पितृछत्र हरपलेल्‍या मुलांचा सांभाळ कसा करायचा? हा आईसमोर प्रश्‍न होता. परंतु पायाने जन्मतः अपंग असलेल्या दिराने तीनही मुलांसह विधवा वहिनीचा स्‍वीकार करत विवाह केला. (dhule-news-karanke-family-Ideal-marriage-widowed-widow-with-three-children)

करंके कुटुंबियातील पाच भावांपैकी एका भावाचा अचानक हृदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्यू झाल. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुलं उघड्यावर आले. संतोष करंके याचे डिसेंबर २०१६ रोजी हृदयविकाराने निधन झाल्यानंतर तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा? असा प्रश्‍न त्यांची पत्नी मनीषा संतोष करंके यांच्यासमोर होता.

समाजानेच केली मध्‍यस्‍थी

संतोष करंके यांच्या मृत्यूनंतर मुलाचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्‍न मनिषा करंके यांच्‍यासमोर होता. त्‍यांचे लहान दिर जितेंद्र करंके हे जन्मतः पायाने अपंग आहेत. अपंगत्वामुळे त्‍यांना मुलगी मिळत नसल्याने वयाची ३८ शी पार केली होती. अशा परिस्थितीमध्ये समाजातील वरिष्ठांनी तसेच शिरपूर तालुक्यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेल्या भूपेशभाई पटेल यांनी देखील या संदर्भात मध्यस्थी करीत जितेंद्र यांना विधवा वहिनीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. प्रथमतः जितेंद्र करंके यांनी नकार दर्शविला. परंतु कालांतराने पटेल यांनी समजावल्यानंतर अखेर जितेंद्र यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

अन्‌ पार पडला आदर्श विवाह

जितेंद्र करंके हे भूपेशभाई पटेल यांच्या शिक्षण संस्थेमध्ये सध्या कार्यरत असून गेल्या साडेचार वर्षांपासून पोरके झालेल्या तिन्ही मुलांना जितेंद्र यांच्‍या रूपाने वडिलांचे छत्र मिळाले आहे. जितेंद्र व मनिषाचा विवाह शिरपूर तालुक्यातील नागेश्वर मंदिरात नातेवाईकांच्या व समाजातील प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. लग्नात सर्वात जास्त लक्ष सातत्याने जात होते ते त्या तीन चिमुकल्यांकडे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT